
छत्रपती शिवाजी महाराज हे १०० टक्के धर्मनिरपेक्ष होते. भारतीयांच्या हृदयात त्यांचं खास स्थान आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या मनातही त्यांचं खास स्थान आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. महाराष्ट्र सदनात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, आज सेक्युलर शब्द खूप वापरात आहे. पण इंग्लिश डिक्शनरीत जो सेक्युलर शब्द आहे त्याचा अर्थ पंथनिरपेक्षता नाही. सेक्युलरचा अर्थ सर्व पंथांचा समान आदर करणं.