आपल्याकडे पुलांची एक्स्पायरी डेटच नाही, त्यामुळे अपघात आणि मृत्यू - गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

पुलांच्या एक्स्पायरी डेटबद्दल बोलताना गडकरींनी ब्रिटिशांच्या काळातला एक किस्सा सांगितला.

आपल्याकडे पुलांची एक्स्पायरी डेटच नाही, त्यामुळे अपघात - गडकरी

दिल्ली - देशात रस्त्यावर होणारे अपघात आणि मृत्यूच्या प्रमाणावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्षाला जवळपास साडेचार लाख अपघात होतात. खरंतर देशात पुलांची एक्स्पायरी डेटच नसते. यामुळे अनेक अपघात आणि मृत्यू होतात गडकरी मंगळवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

गडकरी म्हणाले की, 'देशात महत्त्वाची समस्या आहे ती वाढत्या अपघातांची. आपल्याकडे देशातील पुलांची एक्स्पायरी डेट नाही, सरकारी व्यवस्थेकडे याचा डेटा नाही. एक्सपायरी डेट नाही आणि त्यामुळेच अपघात होतात आणि मृत्यू होतात. त्याबद्दल कोण बोलत नाही. देशातील पुलांची एक्स्पायरी डेट निश्चित करण्याची वेळ आली आहे.'

मला नेहमीच वाटतं की फायनान्शिअल ऑडिट गरजेचं आहे पण परफॉर्मन्स ऑडीटही करण्याची गरज आहे. गुणवत्तेच्या, विशेषत: बांधकामाच्या गुणवत्तेचं ऑडीटही तितकेच महत्त्वाचे असल्याचं गडकरींनी म्हटलं.

पुलांच्या एक्स्पायरी डेटबद्दल सध्या आपल्याकडे डेटा नसल्याचं सांगताना गडकरींनी ब्रिटिशांच्या काळातला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की,'ब्रिटिश काळात नागपूरमध्ये एक रेल्वे ब्रिज बांधला होता. त्याबद्दल अलिकडेच लंडनमधून पत्र आलं की ब्रिजची एक्स्पायरी डेट संपली आहे. त्याचा वापर करणं धोकादायक आहे, त्यामुळे नवीन ब्रिज बांधा. अशी व्यवस्था भारताच्या सिस्टिममध्ये मात्र नाही.'

हेही वाचा: ATMS : गाडी न थांबवता ट्राफिक पोलिस पाठवणार दंडाची पावती

दरम्यान, गडकरींनी स्टील आणि सिमेंट कंपन्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणं हे एक मिशन आहे. रस्त्यासाठी कार्बन स्टील आणि स्टील फायबरसारख्या नव्या साधनांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. स्टील फायबरचा वापर एक नवा निर्णय आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin GadkariIndia
loading image
go to top