ATMS : गाडी न थांबवता ट्राफिक पोलिस पाठवणार दंडाची पावती

express way
express way
Summary

तुमच्याकडे असणाऱ्या गाडीची कागदपत्रे अपडेट असणं गरजेचं आहे. यात गाडीच्या विम्यापासून ते RC पर्यंत सर्व असायला हवं.

नवी दिल्ली - देशात प्रवास करताना तुम्ही जर एक्सप्रेसवेवरून (Express Way) जात असाल किंवा जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. तुमच्याकडे असणाऱ्या गाडीची कागदपत्रे अपडेट असणं गरजेचं आहे. यात गाडीच्या विम्यापासून ते RC पर्यंत सर्व असायला हवं. जर व्यावसायिक वाहन असेल तर त्याचं फिटनेस सर्टिफिकेट हवं. कारण यापुढे एक्स्प्रेसवेवर धावणाऱ्या गाड्यांच्या स्थितीची माहिती सहज समजणार आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेवर जाताच काहीच मिनिटात तुमच्या गाडीबद्दलचे डिटेल्स ट्राफिक पोलिसांना मिळतील आणि दंड भरावा लागेल. यासाठी सरकार आता नवे नियम तयार करणार आहे. यासाठी NHAI कडून महामार्गावर चाचणीही घेतली जात आहे.

देशातील सर्व एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गावर एटीएमएस म्हणजेच अॅडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम लावण्यात येणार आहे. यामुळे धावत्या गाडीच्या नंबर प्लेटसह सर्व माहिती ट्राफिक पोलिसांना समजणार आहे. तसंच वेग मर्यादा, नियमांचे उल्लंघन इत्यादीचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शूट होतील. सध्या या सिस्टिमला परिवहन विभागाकडे नोंद असलेल्या वाहनांचे रेकॉर्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गाडीच्या नंबरवरून विमा काढला आहे की नाही, त्याचे RC डिटेल्स, सीएनजी किट टेस्टिंग सर्टिफिकेट इत्यादीची माहिती मिळणार आहे. याशिवाय दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि देशातील इतर एक्सप्रेसवेवर या सिस्टिमची चाचणी घेतली जात आहे. NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सिस्टिम अॅडव्हान्स असेल, ज्या गाड्यांची कागदपत्रे पूर्ण नाहीत त्या डिटेक्ट होतील. त्यांचा डेटा ट्राफिक पोलिसांकडे जाईल आणि त्यांना दंडाची पावती पाठवण्यात येईल.

express way
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

ट्राफिक पोलिस राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर वाहने थांबवून अनेकदा कागदपत्रांची चौकशी करते. मात्र एटीएमएस सिस्टिम सुरु झाल्यानंतर या नियमांमध्ये बदल होईल. त्यानंतरही गाडी चेक करण्याची पोलिसांना काही अधिकार असतील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा होईल कारण कागदपत्रांमुळे कुणाला अडवावं लागणार नाही. ट्राफिक पोलिस एक्सप्रेसवेवर त्यांनाच अडवेल ज्यांनी अपघात केला आहे किंवा काही गुन्हा केला असेल.

राष्ट्रीय रस्ते आणि परिवहन नंत्रालयाने देशातील सर्व नव्या एक्सप्रेस वेवर एटीएमएस बंधनकारक केलं आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रीय महामार्गावरही ही सिस्टिम सुरु होऊ शकते. सुरुवातीला याचा वापर एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहानांच्या अंतरावरून फास्टटॅगच्या सहाय्याने टोल घेणे एवढाच करण्याचा उद्देश होता. मात्र गेल्या काही दिवसांत मंत्रालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक्सप्रेस वेवर लावण्यात येणारे कॅमेरे आणि नंबर प्लेट रिडरवरून चर्चा झाली. यामध्ये टेक्निकल टीमने म्हटलं की, भविष्यात कोणत्याही वाहनाचा डेटा लिंक करता येईल, त्यामुळे वाहनाची सर्व माहिती मिळेल. यानंतरच परिवनह विभागाने पुढच्या हालचाली केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com