'गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार'

'गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार'

नवी दिल्ली- जो जातीचं नाव काढेल, त्यांना मी ठोकून काढेन या केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा आधार घेत गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपला सुनावले आहे. 

काँग्रसेने एक ट्विट करून गडकरींच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपवर टीका केली आहे. गडकरींनी भाजपच्या आणि मोदींच्या मूळ राजकारणाला धक्का लावणारे हे वक्तव्य केले आहे. मग हनुमानाची जात सांगणारे नेते हे भाजपचेच आहेत, गडकरी त्यांना कधी ठोकणार? भाजपच्या अनेक नेत्यांनी हनुमानाच्या जातीवरून वादग्रस्त वक्तव्ये केली होती, याचा दाखला काँग्रेसने दिला आहे.

दरम्यान, आमच्याकडील पाच जिल्ह्यांत जातीला कोणतेही स्थान नाही. कारण, आम्ही त्यांना इशाराच दिला आहे जातीचे नाव काढले तर ठोकून काढीन. देशातील आदिवासी, पारधी अशा वंचितांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमिनींचा विकास केला जाणार आहे,'' असे प्रतिपादन गडकरींनी काल ता(ता.10) पुण्यात केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com