

Nitish Kumar oath ceremony Update : नितीशकुमार आज(गुरूवार) बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला जबरदस्त बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता हा शपथविधी देखील अतिशय थाटामाटात होणार आहे.
एनडीएच्या सर्वपक्षांनी यासाठी जोरदार तयारी देखील केलेली आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीतून पाटणा येथे दाखल झाले आहेत. याशिवाय, शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींची ग्रँड एन्ट्री होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
तसेच ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यास एनडीएची सत्ता असणाऱ्या सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. याचबरोबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि आयटी मंत्री नारा लोकेश उपस्थित राहणार आहेत.
गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा हे शपथविधी समारंभासाठी बुधवारी रात्रीच पाटणा येथे पोहोचले आहे. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल, भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते सम्राट चौधरी, उपनेते विजय कुमार सिन्हा आणि इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यांची ग्रँड एन्ट्री होणार असल्याची अपेक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार शपथविधीच्या ठिकाणी मोदी रस्ते मार्गाने न येता थेट पाटणा विमानतळावरून गांधी मैदानावर हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. त्यामुळे गांधी मैदानावरच हेलिपॅड उभारण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.