भाजपला 'या' राज्यातीलही सत्ता गमावण्याची भीती; म्हणून...

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 16 January 2020

  • नितीशकुमारांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक
  • भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे विधान

वैशाली (बिहार) : महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमध्ये आपल्या सहकारी पक्षांना कमी महत्व दिल्याने या राज्यांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. जर, तशाच प्रकारे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी वागणूक ठेवली तर बिहारमधील सत्ताही जाऊ शकते याची भीती भाजपला आहे. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते रघुवंश प्रसाद सिंह हे जेडीयूने त्यांच्या पक्षाशी युती करावी यासाठी प्रयत्नशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने नितीश कुमारांकडे निवडणूकांसाठी नेतृत्व दिल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑक्‍टोबर महिन्यात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दलाची (जेडीयू) युती कायम रहाणार असल्याचे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. या विषयी बोलताना शहा म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वात सामोरे जाणार आहोत. भाजप आणि "जेडीयू'मध्ये कुठलेही मतभेद नसून आमची युती कायम आहे असेही ते यावेळी म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि राज्याची प्रगती सुरु असल्याचा दावा त्यांनी केला. अमित शाह यांनी जाहीर केलेल्या भूमिकामुळे बिहारमध्ये जेडीयू मोठया भावाच्या तर, भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत राहणार हे स्पष्ट झाले आहे.

भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

काही दिवसांपूर्वी बिहार भाजपच्या काही नेत्यांनी राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवता पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला होता. तर माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करत आता त्यांचे नेतृत्व सर्वमान्य नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर दोन्हीपक्षांमध्ये धुसफुस समोर आली होती. मात्र, शहा यांनी वैशाली येथील सभेत बोलताना केलेल्या विधानामुळे वादावर पडदा पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar to lead NDA in upcoming Bihar polls says Amit Shah