

Nitish Kumar reviewing the probable ministers list ahead of forming the new Bihar cabinet.
Probable Ministers in Nitish Kumar’s Upcoming Cabinet : नितीशकुमार हे आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार आहेत. पाटणा येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. एनडीएमधील सर्व घटक पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते या सोहळ्यास हजर असणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती राहणार आहे.
नितीश कुमारांच्या शपथविधीपूर्वी त्यांच्या या नवीन मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याबाबतची एक संभाव्य यादी सध्या समोर आली आहे. यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू, भाजप आणि सहकारी मित्र पक्षातील आमदरांची नावे आहेत.
विजय चौधरी, बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, श्रावणकुमार, लेसी सिंग, रत्नेश सदा, दामोदर रावत, जामा खान, श्याम रजक, सुनील कुमार
दिलीप जैस्वाल, सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, नितीन नवीन, नितीश मिश्रा, रेणू देवी, मंगल पांडे, नीरजसिंग बबलू, हरी साहनी, संजय सरोगी, रजनीश कुमार, श्रेयसी सिंग
लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे राजू तिवारी, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे संतोष सुमन, राष्ट्रीय लोक मोर्चाचे स्नेहलता कुशवाह यांची नावे सध्या मंत्रिपदाच्या शपथेसाठी चर्चेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.