CM Nitish Kumar Hijab Controversy
esakal
CM Nitish Kumar Hijab Controversy: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमादरम्यान मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधीपक्ष नेते या मुद्द्यावरून नितीश कुमारांवर सतत टीका करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणानंतर नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
गुप्तचर विभागास मिळालेल्या माहितीनुसार, हिजाब घटनेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. तर सुरक्षा यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की, काही असामाजिक आणि गुन्हेगारी तत्व नितीश कुमार यांना नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जीवाला धोका असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
बिहारची राजधानी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार नवनियुक्त आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते. यादरम्यान नितीश कुमार यांनी नियुक्ती पत्रे घेणाऱ्या एका मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. राजदसह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नितीश कुमार यांच्या कृतीला "लज्जास्पद" म्हटले आहे.
एवढंच नाहीतर अशीही माहिती समोर आली आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाकिस्तानातूनही धमक्या मिळाल्या आहेत. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने हिजाब प्रकरणावरून नितीश कुमार यांना धमकी दिली आहे. पाकिस्तानी डॉनच्या धमकीनंतर, बिहार पोलिस सक्रिय झाले आहेत. बिहारच्या डीजीपींनी शहजाद भट्टीच्या व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.