Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Manikrao Kokate Upate News : नाशिक पोलिस मुंबईला रवाना; कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्याकडे पाठवला
Deputy Chief Minister Ajit Pawar accepts Manikrao Kokate's resignation

Deputy Chief Minister Ajit Pawar accepts Manikrao Kokate's resignation

esakal

Updated on

Manikrao Kokate’s possible arrest and Nashik Police action : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला आहे आणि तो मुख्यमंत्र्याकडे पाठवला आहे. यानंतर नाशिक पोलिस मुंबईकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना अटक होईल.

दरम्यान, माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रूग्णालयात आहेत. ज्या ठिकाणाहून त्यांना अटक करण्यासाठी रवाना नाशिक पोलिसांची टीम रवाना झालेला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर लिलावती रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गार्ड तैनात करण्यात आले आहे.

तर , माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर अजित पवारा यांनी एक्सवर एक पोस्ट करून त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये अजित पवार यांनी या प्रकरणातील आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar accepts Manikrao Kokate's resignation
Hinjewadi Flat Ganja Farm : ‘AI’चा असाही गैरवापर!, पुण्यात हिंजवडीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये चक्क गांजाची शेती

नेमकं काय म्हटलंय अजित पवारांनी? -

''माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे.''

Deputy Chief Minister Ajit Pawar accepts Manikrao Kokate's resignation
31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

तसेच, ''सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.'' अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com