'नोटाबंदीमुळे गरीब समाधानी'; नितीशकुमारांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्‌विटरद्वारे लिहिलेल्या एका संदेशात नितीशकुमार यांनी म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा. उत्तर प्रदेशच्या बाबतीत बोलायचे झाले, तर मागासवर्गीय समाजाच्या मोठ्या घटकाने भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाने या वर्गाला जोडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी होऊ शकली नाही. याशिवाय, नोटाबंदीच्या निर्णयाचा एवढा तीव्र विरोध करण्याची गरज नव्हती. नोटाबंदीमुळे गरीबांच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली आहे आणि या निर्णयामुळे श्रीमंतांना त्रास झाल्याचे या वर्गाला वाटते. मात्र, कित्येक पक्षांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले.'

संदेशामध्ये पुढे नितीशकुमारांनी काँग्रेसलाही शुभेच्छा दिल्या आहेत. "पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाबद्दल शुभेच्छा. मणिपूर आणि गोवा येथे काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष होणे, ही बाब कौतुकास्पद आहे.'

Web Title: Nitishkumar greeted BJP for UP results