Loksabha 2019: 'काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होणार'

 Loksabha 2019: 'काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होणार'

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होईल, असे भाकित आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये  दिल्लीमध्ये आघाडी होण्याची शक्यता होती. परंतु काही कारणास्तव आघाडी झाली नाही यावर नाराज अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला अहंकार जडला असून त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होईल असे भाकित केले. मुस्तफाबादमध्ये ते बोलत होते.

केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्ष आघाडी करण्यास तयार होता पंरतु, काँग्रेस आघाडीसाठी तयार झाले नाही. ज्यावेळी पूर्ण देश मोदी आणि शहाच्या जोडीविरोधात उभारण्यासाठी प्रयत्न करत असाताना काँग्रेसने हे पाऊल उचलणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. त्याचबरोबर, कांग्रेस विरोधी मते विभागून भाजपलाच मदत करत आहे असेही केजरीवाल म्हणाले. तसेच, काँग्रेस केवळ दिल्लीतच नाहीतर पूर्ण देशातच भाजपला मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com