सपा सोबत युती नाहीच, अखिलेश यांनी अपमान केला : चंद्रशेखर आझाद

अखिलेश यादव यांनी आमचा अपमान केल्याचा दावा करत विधानसभेसाठी समाजवादी पार्टीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Chandrashekhar Azad
Chandrashekhar AzadSakal

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सध्या सर्वच पक्षाने प्रचाराला आपआपल्या पातळीवर सुरुवात केली आहे. उत्तरप्रदेशमधील येत्या विधानसभा निवडणुकांत समाजवादी पार्टीसोबत युती करणार नसल्याचे आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी शनिवारी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांनी आमचा अपमान केल्याचा दावा करत विधानसभेसाठी समाजवादी पार्टीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Uttarpradesh Assembly Election Updates)

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आम्ही एका महिन्यापेक्षा जास्त दिवस यावर चर्चा करत होतो आणि मागच्या सहा महिन्यापासून भेटी झाल्या पण युतीसंदर्भात काहीही साध्य झाले नाही. म्हणून आम्ही आगामी विधानसभा स्वबळावर लढणार आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि दलित आणि मागासवर्गीयांच्या ठोस आरक्षण योजनेवर ठाम असून त्यासाठी समाजवादी पार्टी सहमत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच दलित, मागासवर्गीय आणि दुर्लक्षित असलेला समाज अखिलेशला पाठिंबा देत आहे कारण त्यांना वाटतंय की अखिलेश आपल्याला सामाजिक न्याय देईल, पण मला वाटतंय की, अखिलेशला सामाजिक न्यायाचा अर्थच अजून समजलेला नाही, असे चंद्रशेखर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मागच्या पाच वर्षात अखिलेशने एकाही दलित किंवा मागासवर्गीयांच्या घरी भेट दिलेली नाही. अखिलेश यादव यांना फक्त दलित वोटबॅंक पाहिजेत परंतु दलितांसोबत युती करण्यास ते तयार नाहीत असा टोलाही त्यांनी लावला. समाजवादी पार्टी, कॉंग्रेस आणि बहुजन समाज पार्टीने निवडणूकांसाठी आपल्या उमेदवारांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून आझाद समाज पार्टी मागील एक वर्षापासून बीजेपी सारख्या पक्षाला पराभूत करण्यासाठी युती करायला तयार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

त्यादरम्यान आम्ही त्यांना दोन जागा देण्याचं कबूल केलं होतं परंतु त्यांना एक फोन आला आणि त्यांनी युती करण्यास नकार दिला असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com