'अयोध्या, देवबंदमधून लढायची चर्चा करणाऱ्या योगींना भाजपनेच घरी पाठवलं'

Assembly Elections 2022 : समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी ही टीका केली आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathTeam eSakal

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना नेमका कोणता मतदार संघ मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यामुळे आज ही यादी जाहीर झाल्यानंतर योगींच्या मतदार संघाची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांना गोरखपूरमधून (Gorakhpur) उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Yogi Adityanath
Punjab: काँग्रेसची यादी जाहीर, CM चन्नी चमकौर साहिबमधून लढणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांचा गड समजल्या जाणाऱ्या गोरखपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट मिळणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सूरू होत्या. राजकीय वर्तुळात त्यांना अयोध्येतून तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज ज्यावेळी भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यावेळी त्यांना गोरखपूरमधून तिकीट मिळाल्यांचं स्पष्ट झालं आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, योगींना भाजपने निवडणुकीपुर्वीच घरी पाठवलं आहे. मला वाटतंय की, त्यांना घरीच राहावं लागणार आहे. अखिलेश यादव यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.

Yogi Adityanath
‘दिल्लीत कोरोनाचा उच्चांक पोहोचला; आता रुग्णांमध्ये घट होणार’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com