न्यायालयात राष्ट्रगीत नको: सर्वोच्च न्यायालय

पीटीआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करण्याच्या आदेशावरची शाई वाळते न वाळते तोच सर्वोच्च न्यायालयाला याच विषयावर नव्या याचिकेवर निर्णय देणे भाग पडले. कोर्टांमध्येही राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) ही याचिका निकालात काढताना आमच्या आधीच्या निर्णयाला फार ताणू नका, असा इशाराही याचिकाकर्त्यांना दिला.

देशातील सर्व न्यायालयांमध्ये कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करा, अशी मागणी एका वकिलाने याचिकेद्वारे केली होती. याचिका निकालात काढताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रगीत बंधनकारक नाही. यासंदर्भात कोर्टासमोर कोणतीही योग्य याचिका नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रगीताचा निर्णय सर्वांवर लादणे योग्य होणार नाही.

सरकारची बाजू मांडताना ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी म्हणाले, की याचिका योग्य नाही त्यामुळे आम्ही कोणताही प्रतिसाद देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक आहे. राष्ट्रगीत सुरू असताना सर्वांनी उभे राहणे आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणे आवश्‍यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: No Anthem in Court : SC