देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही - ICMR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine
देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही - ICMR

देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही - ICMR

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिम सध्या वेगाने सुरु असली तरी सहा महिन्यांपूर्वी लस घेतलेल्यांमध्ये या लसीचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तिसऱ्या अर्थात बुस्टर डोसची गरज असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र, आयसीएमआरनं यावर स्पष्टीकरण देताना सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव २४ नोव्हेंबरला कॅबिनेटमध्ये; मंजुरीची शक्यता

आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक समीरन पांडा म्हणाले, "सध्या दोन डोस घेतलेल्यांमध्ये ८० टक्के लसीकरण हे आपलं महत्वाचं प्राधान्य आहे. सध्यातरी देशांतर्गत वैज्ञानिक अभ्यास बुस्टर डोसची आवश्यकता असल्याचं आधोरेखित करत नाहीत. सध्यातरी सार्वजनिक लसीकरण हा आपला प्राधान्याचा कार्यक्रम आहे.

हेही वाचा: 'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपला आहे का?'

दरम्यान, भारतात बुस्टर देण्याबाबत चर्चा झडत असताना विविध वैज्ञानिकांनी देखील देशात कमीत कमी अशतः लसीकरण व्हायला हवं. इम्युनॉलॉजिस्ट विनीता बाळ म्हणाल्या, "जेव्हा अनेक लोकांना पहिला डोस मिळणं अद्याप बाकी आहे, तरी भारताने या टप्प्यावर बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे. असुरक्षित लोक तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा रुग्णांना अतिरिक्त लसीचा डोस अर्थात बुस्टर डोससाठी विचार केला जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : सरकारकडून होतेय एकतर्फी कारवाई - फडणवीस

सप्टेंबर महिन्यात आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले होते की, "सध्याच्या घडीला बुस्टर डोस हा आपला मध्यवर्ती विचार नाही. लोकांना दोन डोस देणं हे आपलं महत्वाचं प्राधान्य आहे"

loading image
go to top