कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भारतात नोंद नाही : सूत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भारतात नोंद नाही : सूत्र

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या B.1.1.529 नवा व्हेरिएंट सापडल्याने संपूर्ण जगाचा धोका वाढला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून ब्रिटनने (United Kingdom) आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर हा निर्णय़ घेतला आहे. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा हा विषाणू धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वामध्ये भारतात कोरानाचा नवा व्हेरिएंट आढळला नसल्याची दिलासादायक माहिती अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी दिली आहे. याबाबत एनएनआयने ट्विट केले आहे.

दक्षिण अफ्रिकेत नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या B.1.1.529 या व्हेरिएंटमुळे तेथील कोरोना रूग्णांच्या संसर्गामध्ये वाढ होत आहे. दरमयान, या सर्व घडामोडींनंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली आहे. नव्याने आढळलेल्या व्हेरिएंटबाबत आम्हाला अद्याप फारशी माहिती नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले.

ब्रिटनने आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने (United Kingdom) आता आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर हा निर्णय़ घेतला आहे. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा हा विषाणू धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत याचे ३० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) सहा देशांमधून उड्डाणे ब्रिटनमध्ये रद्द करण्याची घोषणा आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी केली.

ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेकडून B.1.1.529 हा व्हेरिअंटची तपासणी केल्यानंतर त्याला VUI घोषित करण्यात आले. यानंतरच विमान उड्डाणे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: साऊथ आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारतीयांनो सावधान!

भारतातही लवकरच उड्डाणांवर बंदी?

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहिला आहे. दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता त्याची शक्यता मावळली आहे. या दरम्यान, दक्षिण अफ्रिकेली व्हेरिएंटने पुन्हा जगाची चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य सचिन भूषण यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांबद्दल माहिती दिली.

दक्षिण अफ्रिकेच्या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन झाल्याची नोंद आहे आणि त्यामुळे अलीकडेच शिथिल केलेले व्हिसा निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाल्यामुळे देशासाठी सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं. या व्हेरिएंटचा प्रसार वाढल्यास भारतातूनही संबंधित देशांमध्ये प्रवासावर निर्बंध येऊ शकतात. तसेच या देशांमधून विमान प्रवासाला बंदी घातली जाऊ शकते.

loading image
go to top