Terrorists Attacked : जवानांवरील हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा सुगावा नाहीच; ५ जवान झाले होते शहीद

no clue of terrorists who attacked jawans in poonch
no clue of terrorists who attacked jawans in poonch

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम अजूनही सुरू आहे. पुंछमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर केला जात आहे. पण अद्याप दहशतवादी सापडलेले नाहीत.

no clue of terrorists who attacked jawans in poonch
Amit Shah : "सत्यपाल मलिक यांचे म्हणणे योग्य आहे, मग ते..." अमित शहांचा पलटवार

प्राथमिक तपासात ग्रेनेड हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले, मात्र नंतर गोळीबाराचे पुरावेही मिळाले. हे भ्याड कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही. लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाचे शेकडो जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

ड्रोन, हेलिकॉप्टर आणि स्निफर डॉगसह स्पेशल फोर्सचे जवानही मदतीसाठी तैनात करण्यात आले होते. सुमारे १३ किलोमीटर वर पसरलेल्या भाताडुडियाच्या घनदाट जंगलात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या सहा ते सात असण्याची शक्यता आहे.

no clue of terrorists who attacked jawans in poonch
Maratha Reservation: मराठा समाज पुन्हा आक्रमक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला इशारा

पूर्वनियोजित रणनीतीनुसार हा हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांना स्थानिक पाठिंबा मिळण्याचीही चर्चा होती, कारण हा हल्ला पाठिंब्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे डझनभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, दहशतवाद्यांचा हा तोच गट आहे जो अडीच वर्षांपासून या भागात सक्रिय होता. 2021 मध्येही लष्कराने या भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com