No Confidence Motion 2023 : अविश्वास प्रस्तावावर सेनेची तोफ २४ मिनिटे धडाडणार! जाणून घ्या लोकसभेत कोणाला किती वेळ मिळणार

Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांकडून मोदी सरकार विरोधात संसदेत अविश्वास ठराव आणला आहे. या प्रस्तावावर आज (8 ऑगस्ट) दुपारी 12 वाजल्यापासून चर्चेला सुरूवात होणार आहे. या चर्चेदरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधी हे सुरूवात करू शकतात. त्यामुळे मोदी अडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दिलासा मिळाल्यानंतर ते संसदेत का बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसकडून गौरव गोगोई, मनिष तिवारी आणि अअधीर रंजन चौधरी हे चार खासदार बोलणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे बोलणार आहेत. तर सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी आणि किरेन रिजिजू हे मंत्री आपली बाजू मांडणार आहेत.

Rahul Gandhi and Narendra Modi
Ravikant Tupkar News : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत...; पक्ष सोडण्याबाबत रविकांत तुपकरांनी स्पष्ट केली भूमिका

कोणाला किती वेळ मिळणार?

लोकसभेत अविश्वास ठरावावर 12 तास चर्चा होणार आहे. या चर्चेत 6 तास 41 मिनिटे ही भाजपला मिळणार आहेत तर 1 तास 9 मिनिटे इतका वेळ काँग्रेसला मिळणार आहे. तसेच डीएमके, तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी 30 मिनिटं मिळणार आहेत. यासोबतच शिवसेनेला चर्चेकसाठी 24 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. राष्ट्रवादी, समाजवादी, सीपीआय शिरोमणी अकाली, आप या सर्व पक्षांना मिळून 52 मिनिटांचा वेळ मिळणार आहेत

Rahul Gandhi and Narendra Modi
Chhatrapati Sambhaji Raje : "मी निशब्द झालो..."; छत्रपती संभाजी राजेंची भर पावसात वाट पाहत थांबलेल्या आजींसाठी भावनिक पोस्ट

यापूर्वी मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावादरम्यान संसदेत 2008 झाली कॅश फॉर व्होटचे प्रकरण गाजले होते, तसेच 2018 साली राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात मिठी मारली होती. तो दिवस देखील प्रचंड गाजला होता. त्यामुळे आता आज अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान संसदेत काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज दुपारी 12 वाजता या चर्चेला सुरूवात होणार असून ती संध्याकाळी सात पर्यंत चालेल. तसेच ही चर्चा आज आणि उद्या होणार आहे. तर परवा म्हणजेच गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com