Chhatrapati Sambhaji Raje : "मी निशब्द झालो..."; छत्रपती संभाजी राजेंची भर पावसात वाट पाहत थांबलेल्या आजींसाठी भावनिक पोस्ट

chhatrapati sambhaji raje social media post About Two elderly women waiting in the rain
chhatrapati sambhaji raje social media post About Two elderly women waiting in the rain

राजकीय नेत्यांच्या मागे त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी सतत असते. नेते कुठेही गेले तरी त्यांच्याभोवती लोक जमा होतात. बऱ्याचदा कार्यकर्त्यांना नेत्यांकडून काही अपेक्षा देखील असतात. मात्र कुठल्याही इच्छा न बाळगता निखळ प्रेमापोटी कर्यकर्ते देखील नेत्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. असाच एक प्रसंग छत्रपती संभाजी राजे यांच्यासोबत घडला.

भेटीसाठी भर पावसात अर्धाएक तास वाट पाहणाऱ्या दोन आजींबद्दल छत्रपती संभाजी राजेंनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहीली आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या ट्वीटर अकांउटवर या भेटीचे खास फोटो देखील शेअर केले आहेत. बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील या दोन आजी त्यांच्या ताफ्याची अर्धाएक तास वाट पाहत होत्या.

chhatrapati sambhaji raje social media post About Two elderly women waiting in the rain
Raghav Chadha News : राघव चड्ढांच्या अडचणीत वाढ! राज्यसभेच्या ५ खासदारांकडून हक्कभंग प्रस्तावाची मागणी; काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजी राजे यांनी लिहीलं की, "बार्शी तालुक्यातील दहिटणे गावात या दोन आजींनी हात करून आमचा ताफा थांबवला. मी इथून जाणार आहे हे समजताच या दोघीजणी पावसात अर्धाएक तास आमची वाट पाहत थांबल्या होत्या... ताफा थांबताच त्या अगदी लगबगीने गाडीजवळ आल्या. मी गाडीतून उतरताच माझ्या गालावरून हात फिरवला आणि फक्त इतकंच म्हणाल्या, "शिवाजी राजाच्या घरातलं लेकरू येणार हाय त्यला तरी बघता येईल!" मी निशब्द झालो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजही सर्वसामान्यांच्या मनावर असलेलं गारुड आणि छत्रपती घराण्याबद्दल ह्रदयात असलेली पवित्र भावना पाहून मनात प्रचंड उर्जा निर्माण झाली." असे संभाजी राजे म्हणाले आहेत.

Chhatrapati Sambhaji Raje News
Chhatrapati Sambhaji Raje News
chhatrapati sambhaji raje social media post About Two elderly women waiting in the rain
Gyanvapi Masjid : मंदिराखालचं तळघर अन् बेपत्ता राणी...; 'ज्ञानवापी'बद्दल काँग्रेस अध्यक्षांनी लिहिलेली गोष्ट नेमाडेंनी सांगितली

"आपल्याकडूनही लोक राष्ट्रहिताची, सर्वसामान्यांच्या भल्याची अपेक्षा करतात याची जाणीव आणखी स्पष्ट झाली. माझ्या महान पूर्वजांनी केलेल्या महान कार्याची अनुभूती पदोपदी अशा प्रसंगांतून येत राहते आणि तो उज्ज्वल वारसा जपण्याची प्रेरणा व पुढे चालविण्याची ऊर्जा मिळत राहते..." असेही छत्रपती संभाजी राजे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com