Delhi Budget 2023 : दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्राचा नकार; इतिहासात पहिल्यांदाच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Budget 2023

Delhi Budget 2023 : दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्राचा नकार; इतिहासात पहिल्यांदाच...

दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्राने नकार दिला आहे. त्यामुळे दिल्ली सरकार आज अर्थसंकल्प सादर करु शकणार नाही. अभूतपूर्व स्थिती आणि पहिल्यांदाच देशात असं घडत असल्याचा आपने दावा केला आहे. (No Delhi Budget Today Arvind Kejriwal versus central government)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. मंगळवारी विधानसभेत मांडण्यात येणार्‍या दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाला केंद्र सरकारने रोखून धरल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

आतापर्यंत दिल्लीच्या अर्थसंकल्पाला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली नाही आहे. दिल्लीच्या अर्थसंकल्पासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच ते सभागृहात मांडले जाते. असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायाभूत प्रकल्पावरचा खर्च जाहिरातींवरच्या खर्चापेक्षा कमी असल्याने बजेटवर काही प्रश्न उपस्थित केल्याचा गृहमंत्रालयातील सूत्रांचा दावा आहे. पायाभूत सुविधांपेक्षा दिल्ली सरकारने जाहिरातींवर होणारा खर्च जास्त दिसत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस देऊन सरकारकडून स्पष्टीकरण मागितले होते.

मात्र, त्यावर दिल्ली सरकारने उत्तर दिलेले नाही. यामुळे गृहमंत्रालयाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्ली सरकारच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य आणि सामान्य लोकांशी संबंधित समस्यांवर कमी लक्ष देण्यात आले आहे. दिल्ली सरकारच्या बजेटमध्ये जाहिरातींवर अधिक भर देण्यात आला होता. त्यामुळेच त्यात सुधारणा करून पुन्हा अर्थसंकल्प पाठवा, असे सांगण्यात आले होते. मात्र दिल्ली सरकारने त्यात सुधारणा करून अद्याप बजेट पाठवलेले नाही.

टॅग्स :Arvind Kejriwal