'जय' मृत झाल्याचा पुरावा नाही: दवे

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - जय नावाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय वाघ महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्यातून हरवला असून त्याला शोधण्याची मोहिम सुरू आहे. तो मृत झाल्याचे पुरावे मिळालेले नाही. तसेच त्याला शोधण्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती आज केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी लोकसभेतील एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

नागपूरपासून 58 किलोमीटर अंतरावर असलेल्या उम्रेड-करहांदला वन्यजीव अभयारण्यातून जय नावाचा वाघ हरवला होता. याबाबत आज लोकसभेत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. "वाघ मृत झाल्याचा पुरावा उपलब्ध झालेला नाही. तो जिवंत असू शकतो. आम्ही अद्याप त्याला मृत घोषित केलेले नाही', असे लेखी उत्तर दवे यांनी दिले आहे. माणसाचे आणि प्राण्याचे संघर्ष तसेच प्राण्या-प्राण्यातील संघर्ष कमीत कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. व्याघ्र प्रकल्पांसाठी 233.57 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचेही दवे यावेळी म्हणाले. वाघांना वाचवण्यासाठीच्या आराखड्यानुसार वाघांचा रहिवास असलेल्या राज्यांना आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: No Evidance of Jai Death: Dave