स्त्री-पुरुषांना एकमेकांकडून मसाज करून घेता येणार नाही; पार्लरसाठी नवे नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Massage

स्त्री-पुरुषांना एकमेकांकडून मसाज करून घेता येणार नाही; पार्लरसाठी नवे नियम

नवी दिल्ली : सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. महिलांना पुरुषांकडून आणि पुरुषांना महिलांकडून मसाज करून घेता येणार नाही आणि पार्लरचा मुख्य दरवाजा देखील पारदर्शक असावा, असा नियम आहे. गुवाहाटी महापालिकेने (Guwahati municipal corporation) हा नवा आदेश काढलेला आहे.

हेही वाचा: संतापजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार

गुवाहाटी महापालिकेचे आयुक्त देवाशीश शर्मा यांनी हे आदेश काढले आहेत. काही युनिसेक्स पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार वाढले असून त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. या सर्व प्रकाराचा समाजातील चांगल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक नैतिकतेचा आदर करण्यास महापालिका बांधील आहे. त्यामुळे हे नवीन आदेश काढण्यात आले आहेत, असे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.

नवीन नियमांनुसार, गुवाहाटीमधील पार्लर, स्पा सलूनमध्ये स्वतंत्र खोल्या किंवा चेंबर देखील बनविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मुख्य दरवाजे पारदर्शक असावे. युनिसेक्स पार्लर, स्पा, ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलूनसाठी काही अटींसह महापालिकेकडून परवाने देण्यात येणार आहे.

पार्लर, स्पा सेंटरसाठी आम्ही नवी नियमवली जाहीर केली असून आता महिलांना पुरुषांकडून आणि पुरुषांना महिलांकडून मसाज करता येणार नाही. काही आस्थापनांमधील गैरप्रकारांबाबत आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन नवीन नियम तयार करण्यात आले आहेत, असे गुवाहाटी महापालिकेचे सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांनी सांगितले.

loading image
go to top