जग काहीही म्हणो...; काँग्रेसमधील बदलानंतर सोनियांसाठी प्रियांका गांधींची भावनिक पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

जग काहीही म्हणो...; काँग्रेसमधील बदलानंतर सोनियांसाठी प्रियांका गांधींची भावनिक पोस्ट

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षात आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. 80 वर्षीय मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आहे. 24 वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या राज्याभिषेकासाठी काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ( Sonia Gandhi news in Marathi)

हेही वाचा: मोठी बातमी! मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्यानंतर काही तासांतच प्रियांका गांधी वड्रा यांनी आपल्या आईसाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

प्रियांकाने लिहिले की, आई, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. जग काय म्हणते किंवा काय विचार करते याने काही फरक पडत नाही? आम्हाला माहित आहे तु कायमच सर्वांना प्रेम दिलं. प्रियांका गांधी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये 75 वर्षीय सोनिया गांधी हातात पती राजीव गांधी यांचा फोटो घेऊन उभ्या आहेत.

सोनिया गांधी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे छायाचित्र हातात घेऊन ८० वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे काँग्रेसची सूत्रे सोपवली.