लहान मुलांना सध्या लसीची गरज नाही; NTAGI ची केंद्राला माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children vaccine
लहान मुलांना सध्या लसीची गरज नाही; NTAGIची केंद्राला माहिती

लहान मुलांना सध्या लसीची गरज नाही; NTAGI ची केंद्राला माहिती

नवी दिल्ली : देशात सध्या लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीची (corona vaccine) गरज नाही, असं मत नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (NTAGI) केंद्र सरकारला कळवलं आहे. या मागचं कारणही या ग्रुपनं सरकारला सांगितलं आहे. (No need for Covid 19 vaccine for children at the moment NTAGI)

हेही वाचा: राज्याने कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाही : टोपे

NTAGI नं म्हटलं की, लहान मुलांना कोरोनाचा मोठा धोका नाही, त्यामुळं सध्या मुलांसाठी कोरोना लस ही सध्या प्राथमिकता नाही. दरम्यान, लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात कुठलीही घाई केली जाऊ नये असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी ऑक्टोबर महिन्यात म्हटलं होतं.

हेही वाचा: मतदान ओळखपत्राला 'आधार' देण्याचे विधेयक राज्यसभेतही मंजूर

दरम्यान, देशात ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तसेच बूस्टर डोसच्या गरजेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, "कोरोनाच्या लसीलाही सध्याच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने झटका दिला आहे"

Web Title: No Need For Covid 19 Vaccine For Children At The Moment Ntagi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..