esakal | Corona Update : राज्यात दिवसभरात 4,057 रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona update

Corona Update : राज्यात दिवसभरात 4,057 रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात 4,057 नव्या रुग्णांची भर पडली. मृत्यूचा आकडा किंचित वाढला असून आज 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांची एकूण संख्या 1,37,774 वर पोहोचली आहे.

औरंगाबाद, अकोला, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 5, नाशिक 11, पुणे 34, कोल्हापूर 11, लातूर 6 मृत्यू नोंदवले गेले. आज दिवसभरात 4,057 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,86,174 झाली आहे.

हेही वाचा: परळीमध्ये येताच करुणा शर्मांवर गुन्हा दाखल

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असून ती 50,095 पोहोचली. आज 5,916 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,94,767 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.05 टक्के एवढं झालं आहे.

हेही वाचा: Podcast : केरळात पुन्हा 'निपाह'चा शिरकाव ते रोहितने मोडला द्रविडचा विक्रम

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,48,54,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,86,174 (11.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,99,905 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,007 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

loading image
go to top