केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही : सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील एकही मंत्री असा नाही ज्याला अर्थशास्त्र कळते. मागील दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये स्वामींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत तक्रार केली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही, असा टोला भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लगावला. तसेच अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवरून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असेही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. 

एका वेबसाईटशी बोलताना स्वामींनी मोदी सरकारच्या कामगिरीवर वक्तव्य केले. ते म्हणाले, मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील एकही मंत्री असा नाही ज्याला अर्थशास्त्र कळते. मागील दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये स्वामींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी राजन हे मानसिकरित्या पूर्णपणे भारतीय नसून, आपली अर्थव्यवस्था ते जाणूनबुजून बिघडवत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. 

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामींनी त्यांच्या या वक्तव्यावर सारवासारव करत म्हटले, की अर्थव्यवस्थेतील काही बाबी समजून घेणारा एकही नेता विरोधीपक्षात नाही, असे सांगितले.

Web Title: No One Union minister does not understand economics Subramanian Swamy