Gujarat Assembly News: इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात विरोधी पक्षनेता नाही!

भाजपा गुजरातमध्ये विक्रमी १५६ जागांसह सत्तेत आला आहे.
Gujarat Assembly
Gujarat AssemblySakal

Assembly Without Opposition Leader: गुजरात विधानसभेला सभागृहाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नसेल. अपुऱ्या संख्याबळामुळे सभापती शंकर चौधरी यांनी काँग्रेसची पदासाठीची विनंती नाकारली आहे.

डिसेंबर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत, १८२ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसला फक्त १७ जागा मिळाल्या होत्या. या जागा विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक जागांच्या तुलनेत १० टक्क्यांहूनही कमी आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यात विक्रमी 156 जागांसह सत्तेत परतला.

Gujarat Assembly
Delhi News : रेल्वे रुळावर रिल्स बनवणं पडलं महागात; अवघ्या विशीत दोन तरुणांचा मृत्यू

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती चौधरी यांनी काँग्रेसची विरोधी पक्षनेतेपदासाठीची विनंती नाकारली. काँग्रेसने अमित चावडा यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केलं होतं.

१९८५ मध्ये, सत्ताधारी काँग्रेसने आवश्यक संख्याबळ नसतानाही जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाची परवानगी देण्यास सहमती दर्शवली होती.

२०१४ पासून काँग्रेस हा लोकसभेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष देखील आहे परंतु सलग दोन राष्ट्रीय निवडणुकांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळाल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com