पाकिस्तानात गैरमुस्लिमांची संख्या घटल्याचा भाजपचा दावा; जाणून घ्या वास्तव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाची संख्या म्हणजे गैरमुस्लिम धर्मियांची संख्या २३%वरून ३.७%वर घसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अधिकृत माहिती मात्र हा दावा खोटा ठरवत आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व विधेयकाबाबत चर्चा होत असताना आणि नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलकडून सोशल मीडियावर वारंवार आपली बाजू खरी सांगण्यासाठी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाची संख्या म्हणजे गैरमुस्लिम धर्मियांची संख्या २३%वरून ३.७%वर घसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अधिकृत माहिती मात्र हा दावा खोटा ठरवत आहे. या संदर्भात इंडिया टुडेने त्यांच्या वेबसाईटवर वृत्त प्रसिद्ध केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तानातील पहिल्या, १९५१ सालच्या जनगणनेनुसार, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात १४.२०% गैर मुस्लिमांची संख्या होती. त्यावेळी पाकिस्तान आणि बांगलादेशची विभागणी झालेली नव्हती. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश वगळून त्या पश्चिम पाकिस्तानमध्ये गैर मुस्लिमांची लोकसंख्या ३.४४%  होती. तर, पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश जो त्यावेळी पाकिस्तानात होता त्या पूर्व पाकिस्तानमध्ये गैरमुस्लिमांची लोकसंख्या २३.२% होती.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

पाकिस्तानातील जनगणनेच्या अभ्यासावरून काही गोष्टी लक्षात येतात पाकिस्तानात गैर मुस्लिमांची संख्या २३% कधीच नव्हती. अविभाजित पाकिस्तानात सुद्धा लोकसंख्येमधील गैर मुस्लिम समाजाचा वाटा १५% अधिक कधीच गेला नाही. आपण आज असलेल्या पाकिस्तानकडे (म्हणजे पूर्वी असणारा अविभाजित पश्चिम पाकिस्तान) बघायला गेलो तर, गैर मुस्लिमांची लोकसंख्या एकून राज्यातील लोकसंख्येच्या ३.४४% आढळते. जनगणनेतील आकडेवारी सिद्ध करते की, गैर मुस्लिमांची लोकसंख्या पाकिस्तानमध्ये ३.५% च्या आसपास फ़िरकत राहिली आहे. यावरून पाकिस्तानात, स्वातंत्र्योत्तर काळात, गैर मुस्लिमांची लोकसंख्या २३% वरून  ३.७% वर घसरलीच नाही हा केला जाणारा दावा खोटा आहे. तर, बांगलादेशातील गैर मुस्लिमांची लोकसंख्या २२% वरून ७.८% पर्यंत घसरली असल्याचा केला जाणारा दावाही खोटा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Pakistans non-Muslim population didnt decline from 23% to 3.7% as BJP claims