esakal | अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पक्षाचा कोणताही नेता, कार्यकर्ता हस्तक्षेप करणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

randeep-surjewala

महाराष्ट्रात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार या अभिनेत्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर केंद्रीय काँग्रेसने सारवासारव केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पक्षाचा कोणताही नेता, कार्यकर्ता हस्तक्षेप करणार नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पक्षाचा कोणताही नेता, कार्यकर्ता हस्तक्षेप करणार नाही

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - महाराष्ट्रात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार या अभिनेत्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर केंद्रीय काँग्रेसने सारवासारव केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पक्षाचा कोणताही नेता, कार्यकर्ता हस्तक्षेप करणार नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले. मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडताना कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काँग्रेसला आदर असल्याची सारवासारव केली. सर्व कलावंतांना, लेखकांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत पक्षाची बाजू मांडताना सुरजेवाला यांनी टीआरपी गैरव्यवहारावरून सत्ताधाऱ्यांनाच लक्ष्य केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीआरपी गैरव्यवहारावरून लक्ष्य
देशात पहिल्यांदाच गैरमार्गाचा वापर करून वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढविण्याचा प्रकार उघड झाला आहे. देशातील बडी मंडळी सरकारच्या बाजूने एकाच प्रकारचे ट्विट करत असल्याचाही प्रकारही पहिल्यांदाच घडला आहे. त्यांचे शब्द आणि आशयही एकाच प्रकारचे आहेत. याची पोलिसांकडून चौकशी सुरू असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच गोष्टींचा उल्लेख केला होता, असा दावा सुरजेवाला यांनी केला. 

इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

चित्रीकरण, चित्रपटांचे प्रदर्शन यासारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काँग्रेस किंवा कोणताही सहकारी पक्ष हस्तक्षेप करणार नाही. परंतु संपूर्ण देश ज्या कलाकारांचा आदर करतो, त्यांनी आपले चारित्र्य बदलणे आणि सरकारी अजेंडा राबविणे योग्य आहे काय?

- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस

Edited By - Prashant Patil