Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSakal

युपीतील मुस्लिमांच्या उद्धारासाठी एकानेही काम केलेले नाही : ओवेसी

युपीत आगामी काळात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशात आगामी काळात विधानसभा (UP Assembly Election 2022) निवडणुकांचे बिगुल वाजणार असून आता अनेक नेत्यांकडून एकमेकांवर आरोप पत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. दरम्यान, युपीतील मुस्लिमांच्या (Muslims) उद्धारासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने काम केलेले नाही असा आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी शुक्रवारी केला आहे. ते उत्तर प्रदेशातील मुस्लिम: 'डेव्हलपमेंट, सिक्युरिटी आणि इन्क्युजन' च्या सादरीकरणादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (No Political Party Worked for Upliftment of Muslims in UP Says Owaisi)

Asaduddin Owaisi
150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; PM मोदी म्हणतात, 'अशक्यही शक्य...'

ओवेसी म्हणाले, "उत्तर प्रदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाला आहे. राज्यातील कोणत्याही सरकारने मुस्लिमांच्या उद्धारासाठी काम केलेले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की "राजकीय पक्ष तुष्टीकरण करून आपली मते मिळवत राहिले. दरम्यान, बदल व्हायलाच हवा असे सांगत आम्ही हा अहवाल राज्यातील जनतेसमोर मांडू त्यानंतर जनताच ठरवेल की, त्यांचा वापर कोण करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com