esakal | शाळा सुरु करण्यास हरकत नसावी; जागतिक बँकेचा सल्ला । School
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा सुरु करण्यास हरकत नसावी; जागतिक बँकेचा सल्ला

शाळा सुरु करण्यास हरकत नसावी; जागतिक बँकेचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लहान मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे पुरावे असल्याने आणि इतर अनेक देशांमध्ये योग्य काळजी घेऊन शाळा सुरु करता येत असल्याचा अनुभव असल्याने भारतातील शिक्षण संस्थांनीही शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण लसीकरण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही, असे मत जागतिक बँकेने आज व्यक्त केले.

जागतिक बँकेच्या शैक्षणिक गटाने आज एका निवेदनाद्वारे नवीन धोरण प्रसिद्ध केले. ‘अनेक देशांमध्ये योग्य प्रकारे काळजी घेऊन ऑफलाइन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वर्ग सुरु केल्यास संसर्गाचा धोका कमी असतो, असा अनुभव आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : ‘त्याच्या’ श्‍वासासाठी आईचे अपार दातृत्व

संसर्ग स्थितीला एक वर्षाहून अधिक काळ लोटल्याने संसर्गाबाबत आणि त्याला रोखण्याच्या उपायांबाबत आपल्याला आता पुरेशी माहिती आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार लहान मुलांना संसर्गाचा धोका कमी असतो. विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांमुळे संसर्ग प्रसार होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हा सर्व अनुभव पाहता, ऑफलाइन शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण संस्थांनी संपूर्ण लसीकरण होण्याची वाट पाहण्याची आवश्‍यकता नाही,’ असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

शाळा बंद ठेवल्याने संसर्ग प्रसाराचा धोका टळत असला तरी यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि एकूण विकासावर मोठा परिणाम होत असल्याचे जागतिक बँकेच्या निवेदनात म्हटले आहे.

जगभरातील शाळांची स्थिती

शाळांचे वर्ग सुरु -८० टक्के

विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती-५४ टक्के

ऑनलाइन आणि ऑफलाइन-३४ टक्के

पूर्णपणे ऑनलाइन सुरु-१० टक्के

अनियमितपणे सुरु=२ टक्के

loading image
go to top