'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय

Supreme court on Karnataka Hijab Row
Supreme court on Karnataka Hijab RowGoogle

बेंगलुरु: गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये हिजाब प्रकरण चांगलंच तापलं आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील निकाल दिला असला तरी हे प्रकरण अद्याप पूर्णपणे बाजूला झालेलं नाहीये. या प्रकरणाचे पडसाद सातत्याने उमटताना दिसत आहेत. कर्नाटकातील महाविद्यालयामधून सुरु झालेल्या या प्रकरणाने संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून काढलं. आता कर्नाटकातील प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशनने (Pre University Education - PUE)) दुसऱ्या PUC परीक्षा 2022 साठी न बसलेल्या सर्व हिजाब समर्थक आंदोलकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने या आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी हिजाब प्रकरणामध्ये आंदोलन करताना PUC II प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. (Hijab row)

Supreme court on Karnataka Hijab Row
मोठी बातमी : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

कर्नाटकातील PUC च्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार होत्या. मात्र, या काळात अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला होता. काहींना हिजाब घालण्याची परवानगी नसल्यामुळे तर काहीजण त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्याच्या कारणास्तव या परीक्षेपासून दूर राहिले होते.

आपण यासंदर्भातील शक्यता तरी कशी अपेक्षित करु शकतो? जर आम्ही या हिजाब घालायला दिला नाही म्हणून परीक्षेवर बहिष्कार टाकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा घेऊन संधी दिली तर उद्या दुसरं कुणीही काहीही कारण सांगून दुसऱ्या संधीची मागणी करेल. या काळात हायकोर्टाचेही हिजाबच्या विरोधातच आदेश होते. त्यामुळे हे अशक्य आहे, अशी माहीती कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी दिली आहे.

Supreme court on Karnataka Hijab Row
सत्तेत गेल्यापासून सेनेला तिथीचं विस्मरण : शर्मिला ठाकरे

या परीक्षा एकूण 100 मार्कांच्या असून यातील प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची तर लेखी परीक्षा 70 गुणांची आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी हिजाब प्रकरणामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार टाकला त्यांना 30 गुण मिळणार नाहीयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com