काँग्रेससोबत मुख्यमंत्री पदाचे रोटेशन नाही - कुमारस्वामी

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

प्रचंड राजकिय उलथापालथीनंतर कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. शपथविधी समारंभाआधी मात्र काँग्रेससोबत मुख्यमंत्री पदासाठी कुठल्याही प्रकारचे रोटेशन नाही असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि जनता दल (एस) हे दोघे मिळून कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहेत. त्याला अनुसरुन माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

बंगळूर - प्रचंड राजकिय उलथापालथीनंतर कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. शपथविधी समारंभाआधी मात्र काँग्रेससोबत मुख्यमंत्री पदासाठी कुठल्याही प्रकारचे रोटेशन नाही असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि जनता दल (एस) हे दोघे मिळून कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहेत. त्याला अनुसरुन माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

यापूर्वी, 2006 मध्ये कुमारस्वामी यांनी येडियुरप्पासोबत मुख्यमंत्री पदासाठी रोटेशन पद्धत स्विकारली होती. त्यावेळी येडियुरप्पा हे उपमुख्यमंत्री होते. परंतु, काही कारणांनी 20 महिन्यानंतर सरकार कोसळले आणि कर्नाटकमध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. काल (शनिवारी) रात्री काँग्रेस आणि जनता दल (एस) यांच्यात सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

जनता दल(एस) कडे 38 आमदार आहेत त्यांच्या तुलनेत 78 आमदार असणाऱ्या काँग्रेसला मंत्रिमंडळात मोठा वाटा मिळेल अशी आशा आहे. 

Web Title: No Rotational Chief Ministership Arrangement With Congress says Kumaraswamy