Corona Booster Dose : अतिरिक्त बूस्टर डोसबाबत केंद्राकडून मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Booster Dose

Corona Booster Dose : अतिरिक्त बूस्टर डोसबाबत केंद्राकडून मोठी अपडेट

Corona Booster Dose : चीनसह अन्यदेशांमध्ये वाढत्या कोराना बाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Corona : चीनमधील कोरोना लाटेबाबत अखेर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग बोलले; लाट मान्य करत म्हणाले...

वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येनंतर भारतासह अनेक देशांकडून पुन्हा एकदा विमानतळांवर कोरोना चाचणी करण्यासह अनेक गोष्टींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

या सर्वामध्ये कोरोना बूस्टर डोसबाबत केंद्राकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत सध्या अतिरिक्त कोरोना बूस्टर डोसची आवश्यक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारला सर्वात प्रथम सध्या सुरू असलेला बूस्टर डोस ड्राईव्ह पूर्ण करायचा आहे.

हेही वाचा: Corona Update : भारतात कोरोनाची लाट येण्याची शक्यता कमी

24 तासात 134 रूग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात नव्या 134 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात 2,582 कोरोनाचे सक्रीय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

त्याचवेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.11 कोटी लसीचे डोस (95.13 कोटी दुसरा डोस आणि 22.41 कोटी बूस्टचे डोस) देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: China BF.7 Variant : चीनचा व्हेरिएंट येतोय ; नागरिकांनो घाबरू नका; काय म्हणाले डॉ. रवी गोडसे

चार ते सहा महिन्यांत कमी होते प्रतिकारशक्ती

कोरोना लसीमुळे शरिरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती साधारणपणे चार ते सहा महिन्यांत कमी होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. भारतातील मोठ्या लोकसंख्येने ही कालमर्यादा आधीच ओलांडली आहे त्यामुळे बूस्टर डोस देण्याच्या प्रक्रियेवर भर देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जानेवारी 2022 मध्ये भारतात पहिला बूस्टर डोस देण्यात आला होता, ज्याला एक वर्ष पूर्ण झाले. अशा परिस्थितीत अतिरिक्त बूस्टर डोस घेणारी लोकसंख्येला आणखी एक बूस्टर डोस देणे गरजेचे आहे.