Monkeypox: दिल्लीतल्या मंकीपॉक्स रुग्णांना लैंगिक संबंधातून संसर्ग नाही - ICMR

Delhi Monkeypox Latest News
Delhi Monkeypox Latest NewsDelhi Monkeypox Latest News

देशात कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सचीही दहशत पसरली आहे. लैंगिक संबंधांतून हा आजार पसरत असल्याची माहिती समोर येत होती. मात्र आता अभ्यासातून एक वेगळंच निरीक्षण समोर आलेलं आहे.

दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे जे पाच रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यामधला एक हिपॅटायटीस बीचा रुग्ण वगळता इतर कोणालाही लैंगिक संबंधातून झालेला कोणताही संसर्ग आढळून आलेला नाही. नवी दिल्लीतल्या या मंकीपॉक्स रुग्णांबद्दलचा अभ्यास एलएनजेपी हॉस्पिटल आणि आयसीएमआरकडून एकत्रितपणे करण्यात आला आहे. आत्ता असलेल्या मंकीपॉक्स रुग्णांची तपासणी पूर्णतः अगदी बारकाईने झालेली नाही, अशी शक्यता असू शकते. मात्र समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अशा सर्वाधिक धोका असणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून अभ्यास करायला हवा. दिल्लीमध्ये सध्या पाच मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत.

मंकीपॉक्सची साधारण लक्षणं म्हणजे ताप, अंगावर पुळ्या येणं, डोकेदुखी, अंगदुखी, स्नायूदुखी, दम लागणे, थंडी, ताप, घाम येणं, घसा खवखवणं, कफ. दिल्लीत आढळलेल्या पाच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे आणि प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे. या पाचपैकी एकाला हिपेटायटीस बीची लागण झाली आहे. हा रुग्ण वगळता इतर कोणालाही लैंगिक संबंधांतून संसर्ग झालेला नाही. या पाचही रुग्णांनी परदेश प्रवास केलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com