No Snow In Gulmarg : ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर

या सिझनमध्ये गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. परंतु, यंदा ही बर्फवृष्टी गायब झाल्यामुळे, अनेक पर्यटक माघारी परतले आहेत.
No Snow In Gulmarg
No Snow In Gulmargesakal

No Snow In Gulmarg : हिवाळ्यात काश्मिरचे खोरे बर्फाने लपेटून जाते. तेथील बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची नेहमीच जम्मू-काश्मिरला गर्दी असते. देश-विदेशातील पर्यटक येथे दरवर्षी मोठ्या संख्येने येतात आणि बर्फवृष्टीचा आनंद घेतात. हिवाळ्यात तेथील नजारा खरच पाहण्यासारखा असतो, म्हणून तर जम्मू-काश्मिरला भारताचे 'नंदनवन' म्हणून ओळखले जाते.

परंतु, यंदा काश्मिर खोऱ्यातील गुलमर्गमधील बर्फ पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे, गुलमर्गमधील प्रदेश ओसाड पडला आहे. खरं तर या सिझनमध्ये गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. परंतु, यंदा ही बर्फवृष्टी गायब झाल्यामुळे, अनेक पर्यटक माघारी परतले आहेत. या घटनेमुळे भारतावरील ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामाची चिंता आता वाढली आहे.

या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने गुलमर्गमधील एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला होता. ज्यामध्ये गुलमर्ग हे नयनरम्य शहर ओसाड आणि कोरडे पडलेले दिसते आणि जमिनीवर केवळ बर्फाचे तुकडे दिसत आहेत. केवळ गुलमर्गच नाही तर काश्मीरमधील पहलगामसह, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील डोंगराळ प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा कमी प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे.

लाँग ड्राय स्पेल

गुलमर्गमधील या परिस्थितीला ‘लाँग ड्राय स्पेल’ असे म्हटले जाते. लाँग ड्राय स्पेल म्हणजेच बऱ्याच काळापर्यंत बर्फवृष्टी न होणे. खरं तर या सिझनमध्ये ४-६ फूटापर्यंतची बर्फाची चादर गुलमर्गमध्ये पहायला मिळते. मात्र, गेल्यावर्षीचा गुलमर्गचा फोटो पाहिल्यास त्यात बर्फाची चादर दिसून येते तर यंदा ओसाड आणि कोरडे पडलेले गुलमर्ग दिसून येत आहे. जमिनीवर बर्फच नसल्यामुळे हा परिसर पूर्ण कोरडा दिसत आहे.

गुलमर्गमध्ये कोरडा हिवाळा का पडला आहे?

गुलमर्गमधील या परिस्थितीबद्दल हवामान विभागाने सांगितले की, हा कोरडा हिवाळा आहे. काश्मिर खोऱ्यात मागील वर्षी पावसाचे प्रमाण ७९% टक्क्यांनी घटले आहे, त्यामुळे, बर्फवृष्टी क्वचितच पहायला मिळाली.

काश्मिर हवामान विभागाचे संचालक मुख्तार अहमद यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, २०२३ चा डिंसेबर महिना आणि २०२४ चा जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा कोरडा गेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच, मंगळवारपर्यंत (१६जानेवारी) येथील हवामान कोरडे राहिल, अशी माहिती मुख्तार अहमद यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

No Snow In Gulmarg
Travel Diaries : लक्षद्वीपमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ बेटांना भेट द्यायला विसरू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com