'भाजपला 235 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास आश्चर्य नाही'

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

लोकांशी संवाद साधून लक्षात येत आहे की भाजपचा दणदणीत विजय होईल. मागील तीन वर्षांपासून भारतातील राजकारण बदलत आहे.

- मनोज तिवारी

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला 220 पेक्षा अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी व्यक्त केली आहे. "आम्हाला 200 पेक्षा जास्त जागा तर मिळतीलच. परंतु, 235 पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटणार नाही," असे त्यांनी सांगितले. 

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. येथे भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असून विजयाच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू झाली आहे. दिल्लीतील क्रमांक एकचा प्रतिस्पर्धी असलेल्या आम आदमी पक्षाला मागे टाकण्यात भाजपला यश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

तिवारी यांनी स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक जागांपेक्षाही अधिक ठिकाणी भाजपला विजय मिळेल असा दावा केला आहे. मनोज तिवारी यांनी निकाल स्पष्ट होण्यापूर्वी आज (बुधवार) सकाळी देवपूजा, प्रार्थना केली. 
'आम्ही ज्या मार्गावर चाललो आहोत, तो पूर्ण करणे हे आमचे लक्ष्य आहे. लोकांशी संवाद साधून लक्षात येत आहे की भाजपचा दणदणीत विजय होईल. मागील तीन वर्षांपासून भारतातील राजकारण बदलत आहे. दिल्लीतील या निवडणुका म्हणजे केजरीवाल सरकारच्या कामाचा निकाल असेल. तसेच, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीतीचा परिणाम आहे,' असे तिवारी यांनी सांगितले. 
 

Web Title: no surprise if bjp gets 235 seats in mcd, says manoj tiwari