पाकचं शेपूट वाकडंच! कुलभूषण जाधव यांना मदत नाकारली

पीटीआय
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालात जाधव यांच्याशी विनाअट राजनैतिक संपर्क भारताला तातडीने प्रस्थापित करून देण्यात यावा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने त्यास आता नकार दिला आहे.

नवी दिल्ली : हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपाखाली भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमध्ये अटकेत आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता जाधव यांना विनाअडथळा राजनैतिक सहकार्य (कौन्सेलर ऍक्‍सेस) उपलब्ध करून देण्यास पाकिस्तानने आज नकार दिला. 

भारताने जम्मू-काश्‍मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने वेगवेगळ्या पद्धतीने कांगावा करण्यास सुरवात केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालात जाधव यांच्याशी विनाअट राजनैतिक संपर्क भारताला तातडीने प्रस्थापित करून देण्यात यावा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने त्यास आता नकार दिला आहे.

दरम्यान, जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने दहशतवाद व हेरगिरीच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. त्यावर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. नंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No talks says Pak on Jadhav rejects demand of unimpeded consular access