
श्रीनगर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी काश्मीर खोऱ्यात सर्व सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध केला. ‘‘वेगळ्या काश्मीरच्या नावाखाली दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना ‘आमच्या नावाखाली दहशतवाद माजवू नका,’’ असा इशारा यातून देण्यात आल्याचे मानले जात आहे.