मी पंतप्रधान होण्याचा प्रश्नच नाही- नितीन गडकरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मी पंतप्रधान होण्याचा प्रश्‍नच नाही. मी ज्या ठिकाणी आहे तेथे आनंदी आहे. खरेतर मीडियात माझ्या पंतप्रधान बनण्याबाबत बातम्या येताच कशा याचे आश्‍चर्य वाटते. मी ज्या पदावर आहे तेथे खूप काम करायचे आहे. तेरा चौदा देशांना जोडणारा एक्‍स्प्रेस वे तयार करावयचा आहे आणि चार धामसाठी सुंदर रस्ते करायचे आहेत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

पुणे : मी पंतप्रधान होण्याचा प्रश्‍नच नाही. मी ज्या ठिकाणी आहे तेथे आनंदी आहे. खरेतर मीडियात माझ्या पंतप्रधान बनण्याबाबत बातम्या येताच कशा याचे आश्‍चर्य वाटते. मी ज्या पदावर आहे तेथे खूप काम करायचे आहे. तेरा चौदा देशांना जोडणारा एक्‍स्प्रेस वे तयार करावयचा आहे आणि चार धामसाठी सुंदर रस्ते करायचे आहेत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसारख्या राज्यात पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी चर्चा होऊ लागली आहे. मोदींना रिप्लेसमेंट म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे. 

याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी म्हणाले, पक्षाचे प्रवक्ते नियुक्त केले आहेत. त्यामुळे पक्षाविषयी ते माहिती देत असतात. मात्र आजकाल कार्यकर्ते आणि नेतेही कारण नसताना बोलतात आणि वाद निर्माण करतात. त्यामुळे उलटसुलट चर्चा होत असते. त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवरही होत असतो. तसेच माझ्याबाबतही होत आहे. मी पंतप्रधान बनण्याची किंवा तशी अपेक्षाही कधी बोलून दाखविली नाही. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार असण्याचे काही कारणच नाही. मी जेथे आहे तेथे आनंदी आहे.

Web Title: No there is no chance For next Pm Says Gadkari