पनीरसेल्वम यांना विनाअट पाठिंबा नाही: डीएमके

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

चेन्नई : तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर एआयडीएमकेचे नेते ओ. पनीरसेल्वम यांना विनाअट पाठिंबा असल्याचे वक्तव्य डीएमकेच्या उप सरचिटणीस सुब्बालक्ष्मी जगदेसन यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी सुब्बालक्ष्मी यांच्या वक्तव्य पक्षाला मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी आणि सरचिटणीस के. अंबाजहगन हे योग्य तो निर्णय घेतील, असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. पक्षातील नेत्यांनी आपले वैयक्तिक मत जाहीर करू नये, अशी सूचनाही स्टॅलिन यांनी दिली. ओ. पनीरसेल्वम आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "शशिकला यांनी आमदारांची यादी सादर केली आहे. मात्र पनीरसेल्वम यांनी यादी सादर केलेली नाही. शशिकला यांच्याकडे बहुमत आहे. आता राज्यपाल कशाची प्रतिक्षा करत आहेत?', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: No uncoditional support for Pannerselva : DMK