
अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत उपमा दिला जातो. आता सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात तो उपमा नको बिर्याणी आणि चिकन फ्राय आवडतं असं म्हणताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारला विचार करण्यास भाग पडलं.