
Created By : Vishwas News
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली: प्रयागराज महाकुंभादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बस नाल्यात पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बसभोवती अनेक लोक उभे आहेत. व्हिडिओ शेअर करून असा दावा केला जात आहे की ही बस प्रयागराज महाकुंभाला जात होती आणि नाल्यात पडली. या अपघातात १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा प्रयागराज महाकुंभाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे.