Video: जगाच्या पोशिंद्याला नेटिझन्सनी ठोकला सलाम

वृत्तसंस्था
Friday, 18 September 2020

बळीराजा म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा. एका जिद्दी बळीराजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी त्यांना सलाम ठोकला आहे.

नवी दिल्लीः बळीराजा म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा. एका जिद्दी बळीराजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी त्यांना सलाम ठोकला आहे.

Video: दोन सावल्या दिसल्या आणि बोबडीच वळली...

आयएफएस अधिकारी मधु मिथा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यांनी शीर्षक दिले आहे की, 'या व्हिडिओतील शेतकऱ्याला शब्दांनी न्याय दिला जाऊ शकत नाही.' व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून भावना मांडत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका शेतकरी एक पाय नसतानाही भर पावसात चिखलात शेतामध्ये काम करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी आहे. बळीराज्याच्या कष्टामुळे आपण दोनवेळचे अन्न खाऊ शकतो. रात्रंदिवस राबणाऱ्या बळीराजाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण, आपले काम सुरूच ठेवतो. ग्रामीण भागात अनेक सुविधा उपलब्ध नसतात. नैसर्गिक संकटे ओढावली तरी शेतकरी हिंमत न हारता आपले काम सुरू ठेवतो. असाच एक बळीराजा व्हायरल झाला आहे. हा बळीराजा न डगमगता उत्साहात आणि जद्दीने आपले काम करत आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अनेकजण निशब्द झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no words can do justice to this video farmer video viral