बिगर हिंदुंना प्रवेश नाही; काशीमध्ये बजरंग दलने लावले पोस्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kashi
बिगर हिंदुंना प्रवेश नाही; काशीमध्ये बजरंग दलने लावले पोस्टर

बिगर हिंदुंना प्रवेश नाही; काशीमध्ये बजरंग दलने लावले पोस्टर

वाराणसीतील (Varanasi) गंगा घाट आणि धार्मिक स्थळांवर 'बिगर हिंदूंना प्रवेश नाही' (Non Hindus Not Allowed) असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स प्रशासनाने लावले नसून विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलने (Bajrang Dal) लावले आहेत. एवढंच नाही तर सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्या लोकांचं स्वागत आहे, अन्यथा हा पिकनिक स्पॉट नाही, असंही पोस्टर्सवर लिहिलं आहे.

हेही वाचा: Narendra Modi : मोदींनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत चूक

काशीमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने असं करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी 25 डिसेंबरला चर्चबाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं होतं, त्यानंतर 1 जानेवारीला वाराणसीतील मॉल आणि रेस्टॉरंट्सच्या बाहेर पाश्चात्य संस्कृतीशी संबंधित पार्टी साजरी न करण्याचा इशारा देणारे पोस्टरही लावण्यात आले होते. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गंगेच्या घाटाजवळील पक्का घाट आणि धार्मिक स्थळांच्या भिंतींवर अहिंदूंना प्रवेशबंदीचा इशारा देणारे पोस्टर चिकटवले आहेत. सनातन धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांचं स्वागत, इतरांच्या प्रवेशावर बंदी आहे, असं या पोस्टर्सवर स्पष्ट लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पोस्टर लावणारे विश्व हिंदू परिषदेचे काशी महानगरचे मंत्री राजन गुप्ता म्हणाले की, सनातन धर्म नसलेल्या लोकांसाठी चिकटवले जाणारे पोस्टर हे केवळ पोस्टर नसून एक इशारा देणारा संदेश आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :varanasi
loading image
go to top