केरळमध्ये कोरोनादरम्यान आलं 'नोरोव्हायरस'चं संकट; काय आहे हा व्हायरस? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरळमध्ये आलं 'नोरोव्हायरस'चं संकट; काय आहे हा व्हायरस?

केरळमध्ये आलं 'नोरोव्हायरस'चं संकट; काय आहे हा व्हायरस?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Kerala Norovirus case: केरळमधील वायनाड जिल्ह्यात नोरोव्हायरसने संक्रमित एका रुग्णाची नोंद झाली आहे. या घटनेनंतर केरळ सरकारने लोकंना या संसर्गजन्य व्हायरसबाबत सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संक्रमणामुळे पीडित व्यक्तीला उलट्या आणि अतिसार होऊ लागतो. दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यातील एका कॉलेजमधील 13 विद्यार्थ्यांना या दुर्मिळ नोरोव्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की, सध्या परिस्थिती हातात असून अधिक प्रसार झाल्याची माहिती नाहीये.

हेही वाचा: राज ठाकरे-शरद पवार भेटीत 'लालपरी'बाबत काय झाली खलबतं?

काय आहे नोरोव्हायरस?

नोरोव्हायरसच्या संक्रमणामुळे प्रामुख्याने पोट बिघडतं. आतड्यांच्या आतील भागास सूज येते. तसेच उलट्या आणि जुलाब येतो. नोरोव्हायरस चांगली प्रतिकारशक्ती असलेल्यांना संक्रमित करत नाही. मात्र लहान मुलांना तसेच सहव्याधी असणाऱ्या तरुणांना आणि वयस्कर लोकांना याची बाधा होऊ शकते. नोरोव्हायरस हा संसर्गजन्य आजार असून तो रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणि पृष्ठभागावरील स्पर्शाद्वारे पसरू शकतो. तसेच हा विकार झालेल्याने शिजवलेलं अन्न खाल्ल्याने देखील हा विकार होऊ शकतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या मलमूत्र आणि उलट्याद्वारे प्रामुख्याने पसरतो.

हेही वाचा: अण्णा हजारेंचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला, म्हणाले..

काय आहेत याची लक्षणे?

  • जुलाब, पोटदुखी, उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी हा या संसर्गजन्य रोगाची काही प्रमुख लक्षणे आहेत.

  • खूप उलट्या आणि अतिसार झाल्याने डिहायड्रेशन होऊन पुढील परिस्थिती बिकट होऊ शकते.

नोरोव्हायरसला रोखण्यासाठी काय आहेत गाईडलाईन्स?

  • केरळच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नोरोव्हायरसची लागण झालेल्यांनी घरी आराम करावा, ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन्स (ओआरएस) आणि उकळलेले पाणी प्यावे, असं सांगण्यात आलंय.

  • लोकांनी त्यांचे हात जेवणापूर्वी तसेच शौचास जाऊन आल्यावर स्वच्छ धुवावे. पाळीव प्राण्यांना हाताळणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी.

  • पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विहिरी आणि साठवण टाक्या ब्लिचिंग पावडरने क्लोरीन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. लोकांनी घरगुती वापरासाठी क्लोरीनयुक्त पाणी वापरावे आणि फक्त उकळलेले पाणी प्यावे, असंही सांगण्यात आलंय.

  • फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी पूर्णपणे धुवाव्यात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, समुद्रातील मासे आणि शंख जसे की खेकडा आणि शिंपले चांगले शिजल्यानंतरच खाणे आवश्यक आहे. त्यात शिळे आणि उघडे पदार्थ टाळले पाहिजेत.

loading image
go to top