राज ठाकरे-शरद पवार भेटीत 'लालपरी'बाबत काय झाली खलबतं? नांदगावकरांनी दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar & Raj Thackeray

राज ठाकरे-शरद पवार भेटीत 'लालपरी'बाबत काय झाली खलबतं?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: गेले काही दिवस महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यासंदर्भात मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंना घरी जाऊन भेटलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष घालत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी भेटीला गेले होते. त्यांच्यासोबत यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ देखील होतं. राज ठाकरे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा न करता थेट शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे या भेटीला वेगळं महत्त्व असल्याचं मानलं जातंय.

हेही वाचा: मालेगावात का उसळला हिंसाचार? जाणून घ्या बांगलादेश कनेक्शन

या भेटीत नेमकं काय घडलं आणि कशी चर्चा झाली याबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पवार साहेबांच्या कानावर घातले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केली आहे. या भेटीत केवळ एसटी प्रश्नावर चर्चा केली असून ते तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे.

तर बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री यांची सर्जरी झाल्यानं राज ठाकरे शरद पवारांना भेटले. फायनान्सचा विषय असल्यानं पवारांना भेटलो. ते मार्ग काढतील असं वाटतंय. यापुढे राज ठाकरे आणि शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, अशीही त्यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा: क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास लवकरच पुर्ण करू - NCB

त्यांनी म्हटलंय की, शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र, प्रत्येकवेळी लोकांनी शिवतीर्थावर येवून राज ठाकरेंना भेटायला हवं का? ते भेटताता कारण त्यांच्याकडे आलेल्या विषयाचा ते पाठपुरावा करतात. गंभीर विषय असल्यानं ते लगेच पवार साहेबांना भेटायला आले. पुढे ते म्हणाले की, एसटी प्रश्नी सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांचा पगारवाढ होईल. मग ते संप मागे घेतील.

loading image
go to top