Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Earthquake: रविवारी देशाच्या ईशान्येकडील काही भागात ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी दुपारी ४.४१ वाजता भूकंप झाला आणि त्याचे केंद्र आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात होते.
People rush outdoors in Assam after a 5.8 magnitude earthquake shook Northeast India, with tremors felt in Bhutan and Bengal.

People rush outdoors in Assam after a 5.8 magnitude earthquake shook Northeast India, with tremors felt in Bhutan and Bengal.

esakal

Updated on

Summary

  1. ईशान्य भारतात आसामच्या उदलगुरी जिल्ह्यात ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

  2. भूकंपाचे धक्के आसाम, पश्चिम बंगालचा उत्तर भाग आणि भूतानपर्यंत जाणवले.

  3. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

ईशान्य भारताच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी मोजण्यात आली आहे. आसाम सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रविवारी देशाच्या ईशान्येकडील काही भागात ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी दुपारी ४.४१ वाजता भूकंप झाला आणि त्याचे केंद्र आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात होते. भूकंपाची खोली ५ किमी होती. भूकंपामुळे बंगालपासून भूतानपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com