

Northeast Monsoon Forecast Tamil Nadu Gets Rain Support as MJO Favors India and Two Low Pressure Systems Emerge
sakal
-मयूरेश प्रभुणे
तिरुनेलवेली (तमिळनाडू) : ईशान्य मॉन्सूनच्या आगमनालाच ‘मॅडन ज्युलियन ऑस्सिलेशन’ (एमजेओ) भारतासाठी अनुकूल स्थितीत आल्यामुळे यंदा दक्षिण भारताच्या पावसाळ्याची सुरुवात जोरदार झाली आहे. उत्तर हिंदी महासागरात सध्या दोन कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय असून, येत्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.