शेतकरी आंदोलनामुळे उत्तर रेल्वेच्या काही गाड्या रद्द; प्रवासाआधी जाणून घ्या वेळापत्रक

Railway
Railway

नवी दिल्ली : पंजाब-हरियाणा भागात सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. गेल्या सहा दिवसांपासून प्रामुख्याने उत्तर भारतातले शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात जोरदार प्रदर्शन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवरील वाहतुक या आंदोलनामुळे बरिच विस्कळीत झाली आहे. आणि आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने काही ट्रेन्सच्या नियोजित वेळापत्रकात बदल केले आहेत. काही ट्रेन्स या रद्दच झाल्या आहेत तर काहींच्या वेळेत अथवा मार्गात बदल करावा लागला आहे. 

  • 09613 अजमेर-अमृतसर एक्स्पेरस स्पेशल ट्रेन ही आज दोन डिसेंबरला निघणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या तीन डिसेंबर रोजी परत येणारी 09612 अमृतसर-अजमेर स्पेशल ट्रेनदेखील रद्द करण्यात आली आहे.
  • 05211 दिब्रुगढ-अमृतसर एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन उद्या तीन डिसेंबर रोजी निघणार होती, ती ही रद्द करण्यात आली आहे. तसेच 05212 अमृतसर-दिब्रुगढ ही स्पेशल ट्रेन तीन डिसेंबर रोजी निघणार होती, ती ही रद्द करण्यात आली आहे. 
  • 04998/04997 भटींडा-वाराणसी-भटींडा ही एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन देखील पुढील सुचना मिळेपर्यंत रद्दच राहणार आहे.
  • 02715 नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस ही आज दोन डिसेंबर रोजी नवी दिल्लीपर्यंतच जाईल. 02925 बांद्रा टर्मिनस-अमृतसर एक्स्प्रेस ही देखील आज दोन डिसेंबर रोजी चंदीगढपर्यंतच जाईल. 
  • 2 डिसेंबर रोजी 04650/74  अमृतसर-जयनगर एक्स्प्रेसचा मार्ग वळवण्यात आला आहे. ती अमृतसर-तरणातरण-बीअस या मार्गाने जाईल. 
  • 2 डिसेंबर रोजी निघणाऱ्या 08215 दुर्ग- जम्मू तावी एक्स्प्रेसचाही मार्ग वळवण्यात आला आहे. ती लुधीयाना जालंधर-पठानकोट मार्गे धावेल.
  • 08216 जम्मू तावी-दुर्ग एक्स्प्रेस 4 डिसेंबर रोजी निघणार आहे. या एक्स्प्रेसचा मार्ग वळवून पठानकोट-जालंधर-लुधीयाना असा राहील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com